Published On : Thu, May 12th, 2022
By Nagpur Today Nagpur News

सुभान नगर जलकुंभ शट डाऊन – १४ मे रोजी

Advertisement

NHAI ला भारत नगर चौकात करायचे आहे जलवाहिनी वर काम
शटडाऊन दरम्यान व नंतर.. बाधित भागांत टँकर पुरवठा देखील बंद राहणार..

नागपूर : नॅशनल हाय-वे ऑथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI ) ह्यांनी लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या भारत नगर चौकात जलवाहिनी वर काही तांत्रिक जोडणी करण्याकरिता शनिवारी, दिनांक १४ मे २०२२ ला शट-डाऊन घेण्याचे नियोजित केलेलं आहे. या शट-डाऊन दरम्यान लकडगंज झोन अंतर्गत येणाऱ्या सुभान नगर जलकुंभावरील पाणीपुरवठा १४ मे २०२२ ला बाधित राहणार आहे .

तसेच शटडाऊन मधील तांत्रिक काम संपल्यावर पाणी पुरवठा वेळे नुसार त्या त्या बाधित भागातील पाणी पुरवठा सुरु होणार आहे ….ह्या शट डाऊन कालावधी दरम्यान बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. NHAI, नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे.
पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग : सुभान नगर जलकुंभ

भारत नगर, निवृत्ती नगर, गुजराती कॉलोनी , सुभान नगर चा काही भाग आणि चंद्र नगर चा काही भाग

Advertisement

अधिक माहितीकरिता नागपूर महानगरपालिका -च्या मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात .

For more information about water supply consumers can contact OCW Helpline No 1800 266 9899.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.