Published On : Mon, Oct 29th, 2018

विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळावा उत्साहात साजरा

कन्हान : – सालवा येथील श्री साई प्रसाद कॉलेज ऑफ आर्टस् या महाविद्यालयात विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला .

कार्यक्रमाचे विधिवत दिपप्रज्वलन करून उद्घाटन झाले. स्वागत गीत व स्वागतानंतर महाविद्यालयांच्या प्राचार्या डॉ सौ सुप्रिया पेंढारी यांनी आपल्या प्रस्ताविकातून या मेळाव्याचा उद्देश व महाविद्यालयाच्या वाढत्या यशाची गाथा सादर केली. पाच वर्षे पूर्ण होऊन सहाव्या वर्षात महाविद्यालयाचे स्वरूप कसे आहे हे एका वऱ्हाडी कवितेतून सादर केले.

तदनंतर विद्यार्थ्यांची मनोगत झाली त्यातून सविता महादूले , पिंकी भोले , तरणी कुर्वे , पूजा भोले इत्यादी विद्यार्थ्यांनिनी महाविद्यालयातुन त्यांना मिळणा-या सोयी – सवलतीवर प्रकाश टाकून या महाविद्यालयामुळे आमची शिक्षणाची सोय झाली असे आवर्जून सांगितले. प्रा.रंजना धोटे यांनी महाविद्यालयात झालेल्या घटक चाचणी चा निकाल पालकांसमोर सादर करून पालकाच्या हस्ते यशस्वी झालेल्या पाल्याच्या बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला.


तद्नंतर या सत्रात विद्यापीठाने ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात घेतलेल्या क्रीडा स्पर्धेत या महाविद्यालयातील विदयार्थी घेतलेल्या सहभागा बाबदचा (खोखो,कबड्डी,मेरोथॉन) अहवाल सादर केला. या मेळाव्यात विद्यार्थी -पालक-शिक्षक समितीची निवड करण्यात आली. कार्यक्रम च्या शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विजयराव काठाळकर साहेब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

व महाविद्यालयाची प्रगती करण्यात आपण भरगोस यश संपादन कराल अशा आशा व्यकत केल्या . या मेडाव्यात बहुसंख्य पालक -विध्यार्थी-महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी प्रामुख्याने उपस्तीत होते.आभार प्रदर्शन प्रा.काकडे यांनी केले सर्व पालकवर्गाशी हितगून करून त्यांना अल्पोहार देऊन कार्यक्रम उत्साहात पार पडला.