Published On : Tue, Jul 2nd, 2019

दृढ विश्वास आणि कठोर परिश्रमा नी यशाचे शिखर गाठता येतो – बाकल

कामठी: दहावीची परीक्षा ही यशस्वी जीवनात यशस्वी वाटचाल करण्याची पहिली पायरी असते यशाची आशा न करता कठोर परिश्रम व दृढ विश्वासाने केलेला अभ्यास नक्कीच यश मिळवण्यास मदत करतो अपयश आले तरीही खचून न जाता समोर यशाची आशा करीत मेहनत करावी असे प्रतिपादन नवीन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांनी जनहित वाहिनी सामाजिक संघटना रनाळा तर्फे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय च्या प्रेमलतादीदी होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून कामठी पंचायत समिती सदस्या विमलताई साबळे, रजनी धोंगडे , प्रभाग क्र 15 च्या नगरसेविका संध्या रायबोले प्रामुख्याने उपस्थित होत्या. ब्रह्मकुमारी प्रेम लता दीदी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सरळ जीवन उच्च विचार निरोगी स्वास्थ्य नियमित अभ्यास जीवनात यश प्राप्त करण्यास मदत करते प स सदस्य विमल साबळे रजनी धोंगडे यांनी ही विद्यार्थ्यांना आपले मार्गदर्शन करीत यशस्वी जीवनाच्या शुभकामना दिल्या कार्यक्रमाअंतर्गत प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार करून स्मृतिचिन्ह प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

त्यात यश गणेर 96.8 . आर्यन शर्मा 95.8 कीर्ती रहांगडाले 94.5 सहित 45 मुलांमुलीच्या सत्कार करण्यात आला प्रास्ताविक श्रावण केळझरकर यांनी संचालन अतुल ठाकरे तर आभार प्रदर्शन फिरोज खान यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनहित वाहिनी संघटनेचे अध्यक्ष श्रावण केळझरकर, सचिव संजय विश्वकर्मा ,सदस्य उदयसिंग यादव ,मुस्ताक खान, परितोष मुखर्जी , फिरोज खान ,अशोक ठाकरे, इस्माइल खान , सतीश नवले ,मुकेश बडगे, जितेंद्र वांद्रे , बॉबी महेंद् ,संजय घुघुसकर ,राजन पिल्ले, सुनील चलपे ,रंजना काकडे ,महेंद्र भोयर ,ज्योत्स्ना बेलखेडे ,हेमराज पगाळे आदी प्रयत्नशील होते