Published On : Thu, Sep 19th, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात काँग्रेसचे जोरदार निदर्शने; राहुल गांधीविरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या ‘त्या’ नेत्यांवर कारवाईची मागणी

Advertisement

नागपूर : राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शिवसेना आणि भाजप नेत्यांचा निषेध करत काँग्रेस नागपुरात रस्त्यावर उतरली आहे. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी करत काँग्रेस नेत्यांसह कार्यकर्त्यांनी महायुती सरकार विरोधात घोषणा दिल्या.

आज काँग्रेस नेते माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार आणि शहराध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणावर केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप आणि शिंदे गटाचे नेते त्यांच्यावर टीका करत आहेत.

शिवसेना आमदार संजय गायकवाड आणि आता भाजप खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्यावर कारवाईची मागणी यावेळी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.

नागपुरातील व्हरायटी चौकात काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी बर्डी पोलिस ठाण्याला घेराव घालून घोषणाबाजी केली. एवढेच नाही तर काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्याच्या मधोमध पडून रस्ता जाम करण्याचा प्रयत्न केला.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.