
नागपूर : वाहतूक नियमांचे सतत उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात नागपूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ई-चलन प्रणालीतून वारंवार दंडित झालेल्या वाहनधारकांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर तब्बल १४१ जणांचे वाहन चालवण्याचे परवाने निलंबित अथवा रद्द करण्यात आले आहेत.
पोलिसांनी सतत नियम तोडणाऱ्या चालकांची यादी तयार करून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (RTO) कारवाईसाठी प्रस्ताव पाठवले होते. तपासादरम्यान अतिवेगाने वाहन चालवणे, सिग्नल तोडणे, प्रवासी किंवा मालाची अधिक वाहतूक, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणे यांसारखे गंभीर प्रकार समोर आले.
एकूण २,४९४ वाहनचालकांविरोधात कारवाईचे प्रस्ताव पाठवण्यात आले असून त्यापैकी १४१ प्रकरणांमध्ये परवाने निलंबित किंवा रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. उर्वरित प्रकरणांवर RTO स्तरावर सुनावणी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नागपूर ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले असून, वारंवार नियम मोडणाऱ्यांविरुद्ध पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा दिला आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...




