Published On : Sat, May 10th, 2025
By Nagpur Today Nagpur News

नागपूरच्या वाडी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस; ६ वर्षीय चिमुकल्यावर जीवघेणा हल्ला!

Advertisement


नागपूर (वाडी): वाडीच्या दत्तावाडी परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका ६ वर्षीय मुलावर जीवघेणा हल्ला करून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. स्वरूप विजय मेश्राम असं या गंभीर जखमी मुलाचं नाव असून तो आपल्या घराबाहेर खेळत असताना ही धक्कादायक घटना घडली.

सुरक्षा नगरमधील एपी फिटनेस जिमच्या समोर अचानक तीन भटक्या कुत्र्यांनी स्वरूपवर हल्ला चढवला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्यांनी स्वरूपचे अक्षरशः लचके तोडले. मुलगा जागीच बेशुद्ध पडला. नागरिकांनी तत्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं.

प्राथमिक उपचारानंतर स्वरूपची गंभीर अवस्था पाहता त्याला नागपूरमधील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, गळ्यावर खोल जखम असून त्याचे परिणाम मेंदूपर्यंत पोहोचू शकतात. सध्या स्वरूपवर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हा परिसरात मागील काही महिन्यांतील तिसरा भटका कुत्रा हल्ल्याचा प्रकार असून नागरिकांत भीतीचं वातावरण आहे. स्थानिक प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांवर कुठलीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ना कुत्र्यांचं पकडमोहीम सुरू आहे, ना त्यांच्या लसीकरणाची कोणतीही सोय.

या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने तातडीने पावले उचलून नागरिकांचा जीव वाचवावा, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.