Published On : Thu, Jan 2nd, 2020

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या अडचणीबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय

Advertisement

– विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

नागपूर, : गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या अडचणीबाबत लवकरच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक घेवुन धोरणात्मक बाबीवर निर्णय घेण्यात येईल असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज सांगीतले.

Advertisement
Advertisement

विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित भंडारा – गोंदिया जिल्ह्यातील गोसीखुर्द सिंचन प्रकल्पांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू पारवे, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, विदर्भ सिंचन विकास मंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, अधीक्षक अभियंता अं. टालेकर प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनीधी तसेच जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी गोसेखुर्द प्रकल्पाची सद्यस्थिती कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे यांनी दिली. गोसेखुर्द प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण करायचा असल्यास प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी सोडवल्या पाहिजेत. या प्रकल्पासाठीचे भुसंपादन, निधी उपलब्धता, वनजमीन, रेल्वे क्रॉसिंग, रिक्त पदांमुळे कामावर होणारा परिणाम याबाबत मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीत बैठक‍ घेण्यात येईल.

गोसीखुर्द प्रकल्पातर्गत 1058 कोटीची काही निवडक कामे नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रकशन कॉर्पोरेशन ने भंडारा जिल्ह्यात केलेल्या कामाच्या गुणवत्ता तपासणीसाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले.

यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणीची माहिती विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली. प्रकल्पग्रस्तांना वाढीव मोबदला देण्यात येणाऱ्या अडचणीबाबत तसेच पुनर्वसनातील 18 नागरी सुविधा देण्याबाबत धोरणात्मक निर्णय शासनस्तरावर होणे आवश्यक आहे. त्यासाठी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईत विशेष बैठक घेणार असल्याचेही ते म्हणाले.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement