Published On : Sat, Dec 15th, 2018

सीमेंट रस्ता बांधकामदरम्यान शहरातील विविध मार्गावरील वाहतूक बंद

Advertisement

मनपा आयुक्तांचे आदेश : क्रीडा चौक, तुकडोजी पुतळा, जरीपटका मेकोसाबाग येथील रस्ते राहणार बंद

नागपूर: शहरात सुरू असलेल्या विकास कामांतर्गत सीमेंट काँक्रीट रस्ते बांधकामादरम्यान शहरातील विविध ठिकाणची वाहतूक बंद करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत.

Gold Rate
Sept 11,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 52,600 /-
Gold 22 KT ₹ 1,41,600 /-
Silver/Kg ₹ 2,28,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यामध्ये सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ मध्ये क्रीडा चौक ते तुकडोजी पुतळा दरम्यान सीमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील डाव्या बाजूची वाहतूक २० डिसेंबर ते २० मार्च २०१९ दरम्यान बंद राहील तर उजव्‍या बाजूने दुतर्फा वाहतूक सुरू राहणार आहे.

याशिवाय सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ मध्ये छोटा ताजबाग ते तुकडोजी पुतळा ते वंजारी नगर पाण्याची टाकी दरम्यान सीमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील उजव्‍या बाजूची वाहतूक २० डिसेंबर ते २० मार्च २०१९ दरम्यान बंद राहील. सदर ठिकाणी डाव्‍या मार्गावरून दुतर्फा वाहतूक सुरू राहणार आहे.

Advertisement

सीमेंट काँक्रीट रस्ते प्रकल्प टप्पा-३ मध्ये मंगळवारी रेल्वे क्रॉसिंग गेट हरिजन कॉलनी जुना जरीपटका मेकोसाबाग ते सी.एम.पी.डी.आय. नारा घाट रोड दरम्यान सीमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू होत असल्याने या रस्त्यावरील उजव्‍या बाजूची वाहतूक १५ डिसेंबर ते १५ मार्च २०१९ दरम्यान बंद राहील. सदर ठिकाणी डाव्‍या मार्गावरून दुतर्फा वाहतूक सुरू राहणार आहे, असे आदेश महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत. सदरबाबतचे लेखी आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.