Published On : Wed, Jan 29th, 2025
By Nagpur Today Nagpur News

भ्रष्टाचार थांबवा, भाडे वाढवावे लागणार नाही; एसटी तिकिटांच्या दरवाढीच्या निर्णयावर नाना पटोले संतापले

नागपूर : राज्यात एसटी भाडेवाढ केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारला धारेवर धरले. विधानसभा निवडणुकीदरम्यान जनतेवर सवलतींचा वर्षाव करणाऱ्या भाजप युती सरकारने सत्तेत येताच जनतेला लुटण्यास सुरुवात केली आहे, अशी टीका पटोले यांनी केली.

पटोले म्हणाले की, भाजप युती सरकार महागाई नियंत्रणात आणण्यात पूर्णपणे अपयशी ठरले. आता राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहन असलेल्या एसटीच्या तिकिटाच्या दरात १५ टक्के वाढ करून सरकार जनतेची लूट करत आहे. ही दरवाढ तात्काळ रद्द करावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

Gold Rate
Wednesday12 Feb. 2025
Gold 24 KT 85,200 /-
Gold 22 KT 79,200 /-
Silver / Kg 94,800 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पटोले म्हणाले की, राज्याच्या कानाकोपऱ्यात एसटी बस सेवा सुरू आहे, परंतु महामंडळ ही सेवा योग्यरित्या देऊ शकत नाही. एसटी महामंडळाच्या गैरकारभाराचा फटका राज्यातील सामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

ग्रामीण भागात एसटी बसेसची अवस्था चांगली नाही, शिवशाही नावाने सुरू झालेल्या बसेसची अवस्थाही वाईट असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांना योग्य सेवा मिळत नाहीये आणि दुसरीकडे महागाईचा हवाला देत भाडे १५ टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे.

मंत्र्यांना विश्वासात न घेता भाडेवाढीचा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी पटोले यांनी केली. जनतेला लुटण्याच्या निर्णयाची जाणीव नसलेल्या मंत्र्यांना राज्यातील एसटी महामंडळाची १३६० हेक्टर रिकामी जमीन बांधकाम व्यावसायिकांच्या हाती जाण्यात जास्त रस असल्याचे दिसून येते. जर हा भ्रष्टाचार थांबला तर भाडे वाढवण्याची गरज भासणार नाही, असेही पटोले म्हणाले.

Advertisement