Published On : Tue, Feb 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

राज्यातील वाईन उद्योग धोक्यात?आयात शुल्क कपातीने परदेशी वाईन स्वस्त; महासंघाची केंद्राकडे मोठी मागणी

Advertisement

नाशिक : केंद्र सरकारकडून वाईनवरील आयात शुल्कात मोठी कपात करण्याचा विचार सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वाईन उद्योगात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आयात शुल्क १५० टक्क्यांवरून काही देशांसाठी २० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने परदेशी वाईन, वोडका आणि शॅम्पेन स्वस्तात उपलब्ध होणार आहेत. मात्र यामुळे स्थानिक उत्पादकांना मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.

भारत आणि अमेरिका यांच्यात वाईन आयात करारावर चर्चा सुरू असून युरोपीय महासंघ, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि युनायटेड किंगडम या देशांबरोबरही शुल्क कपातीचा विचार सुरू आहे. या घडामोडींमुळे परदेशी वाईनचा ओघ वाढण्याची शक्यता आहे.

Gold Rate
Feb 17 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,000 /-
Gold 22 KT ₹ 1,43,200 /-
Silver/Kg ₹ 2,40,500 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

अखिल भारतीय वाईन उद्योग महासंघ चे अध्यक्ष जगदीश होळकर यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, भारतात तयार न होणाऱ्या प्रीमियम आणि अप्पर प्रीमियम श्रेणीतील महागड्या वाईन स्वस्त झाल्या तर त्याचे स्वागतच आहे. मात्र ५ ते २० डॉलर किंमतीच्या वाईनवरील आयात शुल्क मोठ्या प्रमाणात कमी केल्यास स्थानिक उद्योगावर गंभीर परिणाम होऊ शकतो. “येथील द्राक्ष शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था टिकली पाहिजे. शेतकरी वाचला पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

नाशिकसह राज्यातील द्राक्ष उत्पादकांच्या हितासाठी संतुलित धोरण आवश्यक असल्याचे महासंघाने नमूद केले आहे. स्वस्त वाईनवर १५० टक्के आयात शुल्क कायम ठेवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह काही खासदारांचे शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे मांडणार असल्याची माहिती देण्यात आली.

वाईन उद्योगाचा विकास आणि स्थानिक शेतीचे संरक्षण यामध्ये समतोल साधणारा सकारात्मक निर्णय केंद्राने घ्यावा, अशी मागणी महासंघाने केली आहे. आयात शुल्कातील संभाव्य बदलामुळे राज्यातील वाईन उद्योग आणि द्राक्ष उत्पादकांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement