Published On : Wed, Mar 31st, 2021

पालकमंत्री नितिन राऊत यांना कुंदाताई राऊत यांच्या नेतृत्वात, जिम असोसिएशन नागपूर चे निवेदन

नागपूर: लॉकडाऊन च्या काळात जिम इंडस्ट्री पूर्णतः बंद आहे, याच्यामुळे जिम व व्यायाम शाळेचे मालक आर्थिक संकटात सापडलेले आहे, जशे जिमचा किराया, विद्युत देयक, बँकेचे कर्ज, नोकर वर्गाचा पगार, अशा आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, काही लोकांचा किराया 25000 ते 30000 एवढा आहे, दर महिन्यात लॉकडाउनच्या काळात एवढे पैसे आणायचे कुठून असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

या सर्व बाबींचा विचार करून मा.पालकमंत्री साहेबना निवेदन देण्यात आले, निवेदनामध्ये बाकी व्यापाऱ्यांचे जसे 4 वाजेपर्यंत व्यापार करण्याची मुभा दिलेली आहे, तसेच जिम असोसिएशनला पण जिम सुरू करण्याची संधी द्यावी, करोना मार्गदर्शन सूचनांनुसार तेसुद्धा जिम मध्ये त्याचं काटेकोर पणे नियम पाड़ू , ज़र लवकरात लवकर जिम सुरू नाही केले, तर हे सर्व सुशिक्षित युवक बेरोजगार होऊन जातील, पालकमंत्र्यांनी साहेबनी आश्वासन दिलेले आहे, कीं येणारा नियमावलीमध्ये जिम सुरू करण्यास विचार केले जाईल।