नागपूर : महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत कामठी विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी त्यांच्या घरातील महिलांनी त्यांचे औक्षण केले व उमेदवारीसाठी शुभेच्छा दिल्या.
यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवाचे आशीर्वाद घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले की, पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.जनतेच्या सुख-दुःखात सोबत राहण्याचा प्रयत्न करतो, अशा परिस्थितीत कामठीतील जनता आपल्याला मतदान करेल, अशी पूर्ण आशा असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी विविध राजकीय पक्षांचे उमेदवार आपापले अर्ज दाखल करत आहेत.
Gold Rate
Sept 10,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT
₹ 1 54,700 /-
Gold 22 KT
₹ 1,42,300 /-
Silver/Kg₹ 2,39,700/-
Platinum
₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above