Advertisement
मुंबई: राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी ज्येष्ठ पोलीस अधिकारी हिमांशू रॉय यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
हिमांशू रॉय एक कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकारी होते. पोलीस दलाचे ते बलस्थान होते. गुन्हे तपासात त्यांचा हातखंडा होता. आपल्या सेवाकाळात धारण केलेल्या प्रत्येक पदावर त्यांनी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली. त्यांच्या आकस्मिक निधनाने राज्याच्या पोलीस दलाचे मोठे नुकसान झाले आहे, असे राज्यपाल विद्यासागर राव यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.