Published On : Mon, Oct 3rd, 2022
By Nagpur Today Nagpur News

राज्याचे उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांनी दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर येथे केली माँ दुर्गेची आराधना.

नागपूर : महाराष्ट्र राज्याचे उप-मुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. देवेंद्र फडणवीस ह्यांनी “नवरात्री उत्सव निमित्य जय दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर च्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्या तीरंगी गरबा मंडपाला भेट देऊन माँ दुर्गेची आराधना आणि पूजा केली.

उपस्थित सर्व टेलिकॉम नगर, रामकृष्ण नगर, राणाप्रताप नगर, पांडुरंग गावडे ले आउट, रवींद्र नगर , सेंट्रल एक्ससाईझ कॉलोनी मधील भाविकांना नवरात्री च्या शुभेच्छा देत त्यांनी जय दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर च्या सर्व कार्यकारिणी मंडळाची प्रशंसा देखील केली. या प्रसंगी जय दुर्गा उत्सव मंडळ महिला कार्यकारिणी सदस्यांनी मा. देवेन्द्रजी फडणवीस ह्यांचे औक्षवाण करून तसेच शॉल आणि श्रीफळ देऊन स्वागत केले तसेच पुरुष कार्यकारिणी सदस्यांनी कमळ पुष्पाचा हार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Gold Rate
Friday 14 Feb. 2025
Gold 24 KT 86,300 /-
Gold 22 KT 80,300 /-
Silver / Kg 97,400 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

ह्याप्रसंगी माजी नगरसेवक श्री दिलीप दिवे, मंडळ अध्यक्ष श्री अमोल लोहट, मार्गदर्शक- श्री प्रदीप चौधरी आणि जय दुर्गा उत्सव मंडळ , टेलिकॉम नगर चे सर्व महिला आणि पुरुष सदस्य तसेच गणमान्य नागरिक उपस्थित होते.

ह्यावर्षी दुर्गा मातेच्या आशीर्वादाने “चला रास गरबा ” खेळू या असे म्हणत…जय दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर ह्यांनी १७ व्या वर्षीचा “नवरात्र उत्सव” २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर पर्यंत टेलिकॉम नगर येथील हनुमान मंदिराच्या समोरील प्रांगणात आयोजित करण्यात आलेला आहे .

महिषासुर मर्दिनी दुर्गा देवीच्या मूर्तीची भव्य मिरवणूक तसेच भवानी ढोल-ताशा संपूर्ण महिला वादक पथक ह्यांच्या नाद-वादनात भव्य आगमन आणि त्यानंतर विधिवत स्थापना करण्यात आली. २६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर पर्यंत दररोज संध्याकाळी ७.३० वाजता देवीची महाआरती तसेच सूरप्रवाह ग्रुप ने सुगम संगीत कार्यक्रम सादर केला तसेच आनंद मेळावा, लहान मुलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, डान्स आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.

सप्टेंबर ३० ते ऑक्टोबर ३ दररोज रात्री ८ वाजता “पारिवारिक रास गरबा” चे आयोजन करण्यात आले होते ज्याला पंचक्रोशी तीळ नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. नागपूर शहरातील रेडिओ चॅनेल मधील नामांकित रेडिओ जॉकी सुश्री निशा (Radio Big FM), सुश्री विपाली (Radio Red FM), तसेच राजन (Radio My FM), अभिषेक (Radio City), फरहान (Radio Mirchi) आणि लोकमत डिजिटल मीडिया हेड सुश्री सुरभी शिरपुरकर ह्यांची विशेष उपस्थिती ह्यावर्षी चे रास गरबा चे विशेष आकर्षण ठरले.

Advertisement