Published On : Wed, Mar 31st, 2021

कामठी उपजिल्हा रुग्णालयात कोविड उपचार केंद्र सुरू करा,भाजपाची मागणी

कामठी : – कामठी शहर आणि तालुक्यात कोरोना चा प्रादुभाव मोठ्या प्रमाणात वाढला असून मृत्यू ही मोठ्या प्रमाणात होत आहे
त्यामुळे कामठी उपजिल्हा रुग्णालयात कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या वतीने नायब तहसीलदार आर टी उके यांना आज देण्यात आले

कामठी आणि परिसरातील कोरोना रुग्णांना उपचारासाठी नागपुरातील शासकीय दवाखाना वर अवलंबून राहावे लागते परंतु आता कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे परिस्थिती हाताबाहेर गेल्याने खाजगी रुग्णालयात देखील उपचार सुरू झाले आहेत खासगी रुग्णालयाचा दर सर्वसामान्यांना परवडणारा नसल्याने उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे कोविड उपचार केंद्र तातडीने सुरू करावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली

निवेदन देताना भाजप गटनेता सुषमा सिलाम भाजपा पदाधिकारी उज्वल रायबोले, राज हडोती, रमेश वैद्य सुनील खानवानी,मंगेश यादव तसेच दयाल मेहता,विक्की बोंबले, मनिष यादव,सतिश जैस्वाल आदी उपस्थित होते निवेदनाची दखल घेऊन याबाबत उच्च अधिकाऱ्यांना कळविण्यात येईल असे आश्वासन नायब तहसीलदार आर टी उके यांनी शिष्टमंडळाला दिले