Advertisement
नागपूर: सीताबर्डी येथील मोरभवन बसस्थानकाजवळ बसच्या (MH/31/CA/6178) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस नाल्यात पडता – पडता वाचली आहे. इतकी मोठी दुर्घटना टळल्याणे प्रवाशांनी सुटकेचा श्वास घेतला.
बस एका नाल्याजवळील कुंपण तोडून, काठाच्या अगदी जवळ आल्याने बस नाल्यात पडण्यापासून वाचली.
या घटनेदरम्यान बसमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
ड्रायव्हरने वेळीच सावधगिरी बागळल्याने मोठा अनर्थ टळला.स्थानिक अधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी घटनास्थळी धाव घेतली.