Published On : Tue, May 28th, 2019

VIDEO: नागपूर मध्ये परिवहन मंडळाच्या चालत्या बसने घेतला पेट

नागपूर मध्ये परिवहन मंडळाच्या सरकारी बसने भर रस्त्यात एकाएकी पेट घेतला, आणि अवघ्या काही क्षणातच संपूर्ण बस जाळून खाक झाली आहे. बालाजी नगर येथील पेट्रोल पंपाच्या जवळ गर्दीच्या रस्त्यावरून धावणाऱ्या या बसने आश्चर्यकारित्या पेट घेतला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र बस जळाल्याने परिवहन मंडळाचे मोठे नुकसान झाल्याचे समजत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

बसला लागलेय आगीमुळे धुराचे लोट उसळत होते, या आगीची कल्पना येताच बसच्या ड्रायव्हर व कंडक्टर ने बसमधील प्रवाश्यांना तातडीने खाली उतरवले त्यामुळेच कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र परिसरात नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

दिवसागणिक आगीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणण्याची गरज भासत आहे. दरम्यान या घटनेचे सविस्तर वृत्त अद्याप हाती आलेले नाही.पण नागपूर मध्ये तापमानाचा ज्वर अधिक असल्याने इंजिनमध्ये दबाव निर्माण होऊन ही आग लागत असल्याचे सांगण्यात येतेय.