Published On : Wed, Jan 29th, 2025
By Nagpur Today Nagpur News

कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी; 15 भाविकांच्या मृत्यूची माहिती,अनेक जण गंभीर

पीएम मोदींचा योगी आदित्यनाथ यांना फोन
Advertisement

प्रयागराज : प्रयाराजमधील महाकुंभमध्ये अमृतस्नानाआधी चेंगराचेंगरी झाल्याची बातमी समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत 15 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 28 जानेवारीला महाकुंभमध्ये एक कोटींहून अधिक जण दाखल झाल्याची माहिती होती. आज मौनी अमावस्येनिमित्त महाकुंभमध्ये मोठी गर्दी होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यातच आज ही मोठी दुर्घटना घडली आहे.

कुंभमेळ्यात आज मौनी अमावस्या साजरी होत असताना संगमावर बुधवारी पहाटे १ वाजता चेंगराचेंगरी झाली. या घटनेत १५ भविकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रयागराज येथील परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी फोनवरून संपर्क साधून प्रयागराज येथील परिस्थितीतीचा आढावा घेतला तसेच तातडीने मदत कार्य राबवण्याचे आवाहन केले. प्रयागराजमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीनंतर गर्दी नियंत्रणासाठी आरएएफ तैनात करण्यात आले आहे. कुंभमेळा प्राधिकरणाच्या विशेष कार्यकारी अधिकारी आकांक्षा राणा यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, संगम नाकात गर्दी नियंत्रित करण्यासाठी तयार करण्यात आलेला अडथळा तुटल्यानंतर चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली.

या घटनेत काही जण जखमी झाले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यात कुणीही गंभीर जखमी नाही. घटनास्थळी बचावकार्यही सुरू आहे. या घडामोडींची माहिती असलेल्या लोकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, किमान १५ मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या परिस्थितीला सामोरे जाताना भाविकांनी त्रिवेणी संगमातून माघारी फिरावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.