Published On : Thu, Jun 11th, 2020

टोळधाड निर्मुलनास ड्रोन, अग्निशम न बंब व ट्रॅक्टरचलीत यंत्राने फवारणी

कन्हान :- शेतक-यांच्या शेतातील पिका स टोळधाड या किटकापासुन मोठया प्र माणात नुकसान होत असल्याने कृषी विभाग व अधिका-या मार्फत यावर प्रति बंधात्मक उपायाची जनजागृती करित टोळधाड निर्मुलन करिता किटकनाशकां चे ड्रोन, अग्निशमन बंब व ट्रॅक्टर चलीत फवारणी यंत्र अश्या विविध प्रकारच्या साधनाचा वापर करून टोळधाडी पासुन बचावाच्या उपाययोजना करण्यात येत आहे.

बुधवार दि.१० जुन ला मौजा अजनी ता रामटेक जि नागपुर येथील शेत शिवा रात टोळधाड निर्मूलना करिता किटकना शकांचे ड्रोन, अग्निशमनबंब, ट्रॅक्टर चली त फवारणी यंत्र अशा विविध प्रकारच्या साधनांचा वापर करून टोलधाडीवर निर्मुलनास सकाळी ५ ते १० वाजेपर्यंत कीटकनाशके फवारणी करण्यात आली. कृषी अधिका-यां व्दारे त्यावर उपाय यो जना करणे बाबत जनजागृती पर मार्गद र्शन कऱण्यात आले.

Advertisement

याप्रसंगी नागपुर विभागीय कृषी सहसंचालक श्री भोसले सर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री शेंडे सर, उपविभागीय कृषी अधिका री श्री मिसाळ सर, पंदेकृ विद्यालय किट कशास्त्र विभाग प्रमुख श्री उंदीरवाडे सर, श्री सवाई सर, तालुका कृषी अधिकारी पारशिवनी श्री वाघ सर, तालुका कृषी अधिकारी रामटेक श्री माने सर व इतर शास्त्रज्ञ आणि क्षेत्रीय स्तरावरील कर्मचा री तसेच परिसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement