Published On : Thu, Jun 18th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद;लोकप्रतिनिधींकडून मताधिकाराचा वापर

Advertisement

नागपूर : नागपूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली असून जिल्हाभरातील लोकप्रतिनिधी मतदान केंद्रांवर दाखल होत आहेत. नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि अन्य पात्र मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदविला.

जिल्ह्यातील १४ मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची वर्दळ पाहायला मिळत असून मतदान शांततापूर्ण वातावरणात सुरू आहे. निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासनाने मतदानासाठी आवश्यक सर्व व्यवस्था केल्याने प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत आहे. मतदान केंद्रांवर सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे.

या पोटनिवडणुकीत एकूण ८३६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून त्यांच्या मतांवर उमेदवारांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींमध्ये या निवडणुकीबाबत उत्सुकता असून दिवसभर मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Gold Rate
Aug 26 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 62,400 /-
Gold 22 KT ₹ 1,50,700 /-
Silver/Kg ₹ 2,45,800/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

मतदानाची वेळ सायंकाळी ४ वाजेपर्यंत असून त्यानंतर मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी २२ जून रोजी जिलाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे होणार असून निकालाकडे राजकीय पक्षांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

८३६ मतदार ठरवणार विधान परिषदेतील नवा चेहरा-
नागपूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या या पोटनिवडणुकीत केवळ ८३६ मतदार मतदान करणार असले, तरी त्यांच्या मतांमधून विधान परिषदेतील एका जागेचा निर्णय होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक राजकीय दृष्ट्या महत्त्वाची मानली जात असून प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Advertisement
Advertisement
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews #Crime #CCTVCrime

Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप #NagpurNews #POCSOCase #InstagramCrime

Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake #Crime #newsupdate

नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट #NagpurNews  #Crime #CCTVFootage #news

नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला!   #MaharashtraNews #Newborn #Politics

अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews #MurderCase #CrimeNews

जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges