Published On : Tue, Sep 21st, 2021

तीन दिवसीय ‘जयपूर फूट शिबिराला’ उत्स्फूर्त प्रतिसाद

– ३८६ दिव्यांगांना कृत्रिम पाय, कॅलिपर्स, बैसाखी आणि स्पिलंटसचे वितरण

Advertisement

नागपूर : परम पूजनीय ब्रम्हकालीन सद्गुरू स्वामी शिवभजन महाराजजी यांच्या ८७व्या जयंतीनिमित्त पूज्य सद्गुरू स्वामी नारायण भजन महाराज यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनात पूज्य समाधा आश्रमात तीन दिवसीय ‘जयपूर फूट शिबिराचे’ आयोजन करण्यात आले होते. शिबिरात ३८६ दिव्यांगांना कृत्रिम पाय, कॅलिपर्स, बैसाखी आणि स्पिलंटसस तयार करून वितरित करण्यात आले. यात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ येथील दिव्यांगांनी सुद्धा लाभ घेत शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Advertisement

शिबिर कार्यक्रमात महापौर दयाशंकर तिवारी, माजी आरोग्य समिती सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा, मंगळवारी झोन सभापती प्रमिला मथरानी, नगरसेवक महेंद्र धनविजय, बाबा खटवाले मेकोसाबागचे प्रमुख फकिरा भैया, झोन पाचचे पोलीस उपायुक्त श्री. निलोपतल, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी, डॉ. परमानंद लहरवानी, महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे उपाध्यक्ष डॉ. विंकी रुघवानी, नगरसेविका सुषमा चौधरी, जयपूर फूट टीमचे पर्यवेक्षक डॉ. देवकीनंदन, ऑल इंडिया समाधा आश्रम ट्रस्टचे अध्यक्ष पप्पूभाई मंधान आदी उपस्थित होते.

Advertisement

यावेळी महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, समाजातील वंचित, मागास लोकांची सेवा पूज्य समाधा आश्रमाद्वारे करण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तींना उभे राहता यावे, त्यांनाही चालता यावे यासाठी त्यांना कृत्रिम पाय आणि कॅलिपर्स देऊन ईश्वरीय कार्य करीत आहे, अशा शब्दात महापौरांनी पूज्य समाधा आश्रमाचे यावेळी कौतुक केले.

पूज्य समाधा आश्रमाद्वारे करण्यात येत असलेल्या मानवी सेवा नागपूरच्या जनतेपर्यंत पोहचत आहेत. तसेच जयपूर फूट शिबिराच्या माध्यमातून महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ येथील दिव्यांग व्यक्तींनी सुद्धा लाभ घेतला असल्याचे माजी आरोग्य समिती सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक वीरेंद्र कुकरेजा यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.

चंद्रकुमार टेकचंदानी यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितले की, समाधा आश्रमाच्या माध्यमातून परम पूज्य सद्गुरू स्वामी शिवभजन महाराजजी यांच्या मानवी सेवेचा संदेश जयपूर फूट शिबिरातून जनमानसापर्यंत पोहचविण्यात आला. या शिबिरात एकूण ३८६ दिव्यांगांना कृत्रिम पाय, कॅलिपर्स, बैसाखी आणि स्पिलनटसचे वितरण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी महावीर विकलांग सहायता समिती कोटा येथून आलेल्या तांत्रिक कामगारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन व आभार नीलम ठकवानी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाधा आश्रम सेवा मंडळाच्या सर्व सेवकांनी सहकार्य केले.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement