Published On : Wed, Feb 26th, 2020

कराटे च्या बेल्ट ग्रेडिंग परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

कामठी : संदीप कांबळे कामठी
कामठी ता प्र 25:-बु-शिन -दो कराटे असोसिएशन च्या वतीने ड्रॅगन पॅलेस टेम्पल जवळील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक संशोधन केंद्र येथे आयोजित बेल्ट ग्रेडिंग परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला असून या परीक्षेत जवळपास 32 विद्यार्थ्यांनी सहभाग झाले होते यातील उत्कृष्ट विद्यार्थ्याना रेड बेल्ट, ऑरेंज बेल्ट , येलो बेल्ट , ग्रीन बेल्ट तसेच पर्पल बेल्ट ने सम्माणीत करण्यात आले.

यानुसार आदर्श बोरकर, धनश्री बागडे, दुर्गेश बन्सोड, अक्षरा काळे,मित भारती,निशीत पोहरे ला रेड बेल्ट, श्रुष्टी नागदिवे,रोशनी बागडे,अर्पित बोरकर, नैतिक गजभिये,निशांत बोरकर ला ऑरेंज बेल्ट, चैतन्य डोंगरे, त्रिरत्न मेश्राम, इशिका गोडबोले, तनवी उके, शाश्वत तांबे, आदर्श मेंनपाले,भावेश मनगटे, समर्थ डोंगरे,अक्षोभ्य देशभ्रतार,अभिजित चौधरी,रितेश बागडे, स्वयम बागडे,सुहाना कांबळे, गोमेश बागडे, येलो बेल्ट प्रदान करून सम्माणीत करण्यात आले तसेच सागर सुखदेवे नागपूर ला ग्रीन बेल्ट तसेच अनमोल सुखदेवे नागपूर ला पर्पल बेल्ट देऊन सम्माणीत करण्यात आले.

या ग्रेडिंग परीक्षेला मुख्य परीक्षक म्हणून सेन्सई संजय चौरे,सेन्सई सतीश मेश्राम, सेन्सई पदमाकर पाटील, सेन्सई मनोज अडकणे यांनी मोलाची भूमिका पार पाडली.तसेच या विदयार्थ्यांना आंबेडकर भवन शाखेचे प्रशिक्षक सेन्सई कमल तांडेकर, भीलगाव शाखेचे प्रशिक्षक सेन्सई योगेश गोंडाने, रणाळा शाखेचे प्रशिक्षक सेन्सई अभिषेक चहांदे, नागपूर शाखेचे प्रशिक्षक सेन्सई अमनं अडकणे, सेन्सई अमोल सुखदेवे यांनी प्रशिक्षित केलेले आहे.


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेन्सई पदमाकर पाटील यांनी केले मार्गदर्शन सेन्सई सतीश मेश्राम तर आभार प्रदर्शन सेन्सई मनोज अडकणे यांनी केले तर विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी ऍड योगेश बागडे, उमेश पोहरे,कांबळे, शैलेश चौधरी, चंद्रशेखर डांगे यांनी मोलाची भूमिका साकारली.