Published On : Mon, Aug 15th, 2022

तिरंगा पदयात्रेमध्ये नागपूरांचा उत्स्फूर्त सहभाग

Advertisement

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शनिवारी (ता. १३) सकाळी त्रिशताब्दी चौक ते त्रिशरण चौक पर्यंत तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. यावेळी आमदार सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, मोहन मते, मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी, माजी आमदार सर्वश्री गिरीश व्यास, डॉ मिलिंद माने, नाना शामकुळे, माजी महापौर श्री. दयाशंकर तिवारी, श्री. संदीप जोशी, नंदा जिचकार, अर्चना डेहनकर, माजी सत्ता पक्ष नेता श्री. अविनाश ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांनी भारतरत्न संविधान निर्माता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. उपमुख्यमंत्री श्री. देवेन्द्र फडणवीस यांनी नागरिकांना स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाची शुभेच्छा दिली. त्यांनी प्रत्येकाला या देश गौरवाच्या अभियानात सामिल होण्याचे आवाहन केले.

या तिरंगा पदयात्रेमध्ये नागपूर शहरातील नागरिक हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने सहभागी झाले. संपूर्ण परिसर ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ च्या जयघोषाणे दुमदुमला. सर्वांच्या हातामध्ये तिरंगा ध्वज होता. संपूर्ण वातावरण तिरंगामय झाले होता. पं. बछराज व्यास स्कूल, ठवरे हायस्कूल, साईनाथ स्कूल, मानवता स्कूल, साखरे स्कूल शाळेतील मुलांनी रॅलीत सहभाग नोंदवला. बँड पथकातर्फे देशभक्ती गीतांची प्रस्तुती करण्यात आली. याप्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वेशभुषेत सर्जेराव गलपत हे आकर्षणाचे केन्द्र होते.

नागपूर महानगरपालिका आणि मॅट्रिक्स वॉरिअर्स संस्थेतर्फे फ्लॅश मॉब आणि देशभक्ती पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. मॅट्रिक्स वॉरियर्स ऑर्गनायझेशनच्या युवकांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले. गणेश वंदना करून त्यांनी कार्यक्रमाची सुरूवात केली. त्यानंतर देशभक्तीपर गीतांवर उत्साह वाढविणारे नृत्य सादर केले. समुहातील युवकांनी झाशीची राणी, चंद्रशेखऱ आजाद, सुभाषचंद्र बोस यांच्या देशसेवेचे उल्लेख करून, स्वातंत्र्य सैनिकांबाबत राष्ट्रभक्ती जागवली. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी किती अडचणी आल्यात याबाबत माहितीपर नाटिका सादर करण्यात आली. पुढील पिढीला आपल्या भारत देशाच्या तिरंग्याचा सन्मान आणि महत्व कळावं यासाठी समुहाच्या तरुणांनी संदेशपर पथनाट्य सादर केले. त्यानंतर वंदे मातरम.. भारत माता की जय.. अशा घोषणा दिली.

यावेळी खादी आयोगाचे संचालक जयप्रकाश गुप्ता, संजय भेंडे, दिलीप दिवे, गोपाळ बोहरे, रमेश सिंगारे, दीपक चौधरी, लता काडगाये, लखन येरवर सोबत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.