Published On : Tue, Jul 16th, 2024
By Nagpur Today Nagpur News

राजकीय हालचालींना वेग;सुनेत्रा पवारांनी घेतली शरद पवार अन् सुप्रिया सुळेंची भेट,चर्चेला उधाण

Advertisement

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय हालचालींना सुरुवात झाली आहे.पुण्यातील शिवाजीनगर भागातील मोदी बागेतील शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या निवासस्थानी सकाळच्या सुमारास सुनेत्रा पवार यांनी या दोघांची जवळपास तासभर भेट घेतली.

या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुर झाल्या आहेत. तत्पूर्वी कालच अजित पवार गटाचे जेष्ठ नेते छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटले होते. या भेटीनंतरही राजकीय वातावरण चांगेलच तापल्याचे पाहायला मिळाले.

Gold Rate
08 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,01,800 /-
Gold 22 KT ₹ 94,700/-
Silver/Kg ₹ 1,15,800/-
Platinum ₹ 46,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत हातमिळवणी केली.यानंतर शरद पवार गटात मोठी फूट पडल्याचे समोर आले.

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार तर शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा निवडणुक लढवली. मात्र याठिकाणी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे पुन्हा खासदार झाल्या. त्यानंतर सत्ताधारी पक्षांकडून सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड करण्यात आली.

Advertisement
Advertisement