मुंबई — डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो अनुयायी मुंबईत दाखल होणार आहेत. संभाव्य गर्दीची पूर्वकल्पना घेऊन मध्य रेल्वेने मोठी तयारी पूर्ण केली असून, ४ ते ८ डिसेंबरदरम्यान एकूण १५ विशेष अनारक्षित लांब पल्ल्याच्या गाड्या तसेच १२ उपनगरी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या विशेष सेवांमुळे नागपूर-मुंबई मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. नागपूर-सीएसएमटी, दादर-नागपूर, अमरावती-सीएसएमटी, कलबुर्गी-सीएसएमटी आणि कोल्हापूर-सीएसएमटी या मार्गांवर गाड्या चालवल्या जाणार आहेत. नागपूर विभागात सर्वाधिक सेवा उपलब्ध असतील.
लांब पल्ल्याच्या विशेष गाड्या — वेळापत्रक
४ डिसेंबर: नागपूर–सीएसएमटी (०१२६०, ०१२६२)
५ डिसेंबर: नागपूर–सीएसएमटी (०१२६४, ०१२६६)
६ ते ८ डिसेंबर: सीएसएमटी–नागपूर चार विशेष सेवा
या गाड्या अजनी, वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण व दादर या प्रमुख स्टेशनांवर थांबतील.
कर्नाटकातून येणाऱ्यांसाठी कलबुर्गी–सीएसएमटी या मार्गावर ५ आणि ७ डिसेंबर रोजी दोन विशेष गाड्या चालतील. तसेच अमरावती–मुंबई (५ आणि ६ डिसेंबर) आणि कोल्हापूर–मुंबई मार्गावरही विशेष सेवा उपलब्ध असतील.
मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे की सर्व गाड्या अनारक्षित असतील आणि तिकीट यूटीएस अॅप किंवा काउंटरवर सामान्य भाड्याने उपलब्ध असेल.
गर्दी व्यवस्थापनासाठी रेल्वेची मोठी मोहीम
दादर स्टेशनवर १०० हून अधिक कर्मचारी तैनात
महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था
चैत्यभूमी परिसरात विशेष तिकिट बुकिंग सुविधा
उपनगरी विशेष गाड्या – ५/६ डिसेंबर मध्यरात्री
महापरिनिर्वाण दिनानिमित्त परळ–कल्याण आणि कुर्ला–वाशी/पनवेल दरम्यान १२ उपनगरी विशेष गाड्या धावतील.
मुख्य मार्ग – अप (कुर्ला/ठाणे/कल्याण → परळ)
कुर्ला–परळ: ००:४५ → ०१:०५
कल्याण–परळ: ०१:०० → ०२:२०
ठाणे–परळ: ०२:१० → ०२:५५
मुख्य मार्ग – डाउन (परळ → कुर्ला/ठाणे/कल्याण)
परळ–ठाणे: ०१:१५ → ०१:५५
परळ–कल्याण: ०२:३० → ०३:५०
परळ–कुर्ला: ०३:०५ → ०३:२०
हार्बर मार्ग – अप (वाशी/पनवेल → कुर्ला)
वाशी–कुर्ला: ०१:३० → ०२:१०
पनवेल–कुर्ला: ०१:४० → ०२:४५
वाशी–कुर्ला: ०३:१० → ०३:४०
हार्बर मार्ग – डाउन (कुर्ला → वाशी/पनवेल)
कुर्ला–वाशी: ०२:३० → ०३:००
कुर्ला–पनवेल: ०३:०० → ०४:००
कुर्ला–वाशी: ०४:०० → ०४:३५
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वैध तिकीटासहच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. सर्वांनी या विशेष सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.










