Published On : Mon, Sep 9th, 2019

ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या आश्रयदात्या नोरिको ओगावा मॅडम यांच्या अंतिम संस्कार निमित्त विशेष बुद्ध वंदना

Advertisement

कामठी :- कामठी येथील विश्वविख्यात विश्वप्रसिद्ध ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या आश्रयदात्या महाउपासिका मॅडम नोरिको ओगावा यांचा दीर्घ आजराने 2 सप्टेंबर ला टोकियो येथील जिकेका हॉस्पिटल मध्ये दुःखद निधन झाले .यांच्या या दुःखद निधनाने सर्वत्र शोककळा पसरली असून बौद्ध धम्माची एक प्रसार व प्रचारक महान बौद्ध उपसिका गमावला असल्याची खंत व्यक्त करण्यात येत आहे.

या दुःखद समयी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या माजी राज्यमंत्री अॅड. सुलेखाताई कुंभारे ह्या टोकियो येथील नोरिको ओगावा यांच्या निवासस्थानी त्यांच्या पार्थिव देहावर पुष्पगुच्छ अर्पण करून श्रद्धांजली वाहली, तर आज सकाळी साडे नऊ वाजता कामठी येथील विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पुज्यनिय भीक्षुसंघाच्या मुख्य उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना घेऊन बुद्धवासी नोरिको ओगावा मॅडम यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी नलिनीताई कुंभारे, सुकेशीनी मुरारकर, अजय कदम, , उदास बन्सोड, दिपंकर गणविर, सुभाष सोमकुवर, मुस्ताक अली, मोबीन पटेल, मनोहर गणविर, राजेश गजभिये, राजु भागवत, शालीकराम अडकने, मनीष मेंढे,शरद राहाटे, संदीप नगरारे, शुभम रंगारी, सागर भावे, अमोल मेश्राम,राजेश शंभरकर, दिपक डांगे, चंदु कापसे, महेंद्र मेंढे, सावला सिंगाडे,रजनी लिंगायत, सीमा सोमकुवर, समरीत पंचभाई, रजनी गजभीय, रेखा मेंढे,वंदना आळे, शालु सावतकर, ईत्यादी उपस्थित होते.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.