Published On : Mon, Sep 28th, 2026
By Nagpur Today Nagpur News

यवतमाळ येथील धनोड्यात बावनकुळेंची शेतात पाहणी; करपलेल्या सोयाबीनने दुष्काळाची दाहकता केली स्पष्ट

पावसाअभावी सोयाबीन पीक करपले; शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या, एकविरा देवस्थानाकडून ३१ हजारांची मदत
Advertisement

यवतमाळ येथील धनोड्यात बावनकुळेंची शेतात पाहणी; करपलेल्या सोयाबीनने दुष्काळाची दाहकता केली स्पष्ट

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने शेतीसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. महागाव तालुक्यातील धनोडा येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट शेतात जाऊन करपलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली. शेतातील पिकांची झालेली अवस्था पाहून त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

पावसाअभावी सोयाबीनचे पीक हातातून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असून, उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी पिकांच्या नुकसानीबाबतची परिस्थिती बावनकुळे यांच्यासमोर मांडली. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेतला जात आहे.

Gold Rate
Sept 28,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 49,200 /-
Gold 22 KT ₹ 1,38,500 /-
Silver/Kg ₹ 2,25,900/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, दुष्काळाच्या संकटात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हिवरा संगम येथील एकविरा देवस्थानानेही पुढाकार घेतला. देवस्थानाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी ३१ हजार रुपयांची मदत जाहीर केली. देवस्थानचे अध्यक्ष साहेबराव पाटील कदम यांनी बावनकुळे यांच्याकडे ३१ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी देवस्थानाने मदतीचा हात पुढे केल्याने या सामाजिक बांधिलकीचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले. धनोड्यातील करपलेल्या सोयाबीनची पाहणी करताना शेतकऱ्यांची परिस्थिती आणि दुष्काळाची तीव्रता प्रशासनासमोर पुन्हा एकदा ठळकपणे आली.

Advertisement
Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.