Published On : Sun, Sep 22nd, 2019

Video: दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्र स्मार्ट प्रोजेक्टच्या दृष्टिकोनातून पहिल्या क्रमांकावर – आमदार कोहळे

Advertisement

नागपूर : नागपूर विधानसभा क्षेत्रांची स्वच्छता आणि विकासाच्या मापदंडावर तुलना केली तर दक्षिण क्षेत्र हे इतर विधानसभा क्षेत्राच्या तुलनेत पहिला क्रमांकावर आहे, असे मत दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधाकर कोहळे यांनी रविवारी ‘नागपूर टूूडेला’ दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.

दरम्यान कोहळे म्हणाले की, मी पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर दक्षिण नागपुरातील रखडलेल्या विकास कामांना गती देणे हे सर्वांत मोठे आवाहन माझ्यापुढे होते. यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्त्यांचे सिमेंटीकरण, तीर्थक्षेत्रांचा विकास, महिलांसाठी स्वयंरोजगार निर्मिती असे अनेक कार्य रखडलेले होेते. मागील 5 वर्षांत जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम केले, असे आमदार कोहळे यांनी सांगितले.

यंदाच्या विधानसभा-2019च्या निवडणुकीत विद्यमान आमदार सुधाकर कोहळे हे पुन्हा एकदा दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रातून भाजपच्या तिकीटीवर निवडणू लढणार आहे.

Advertisement

जनतेने आपल्याला निवडून दिल्यास दक्षिण नागपूर भागात 4 मेगा प्रोजेक्ट कार्यान्वित करणे आणि तरुणाईच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणे हे आपले लक्ष्य असल्याचे आमदार कोहळे यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.