Published On : Wed, Mar 22nd, 2017

शेकडो मैल चिमुकला घेऊन गेला बापाचे पार्थिव

Advertisement
Son carries dead father on shoulder

File Pic


नागपूर:
धड धड करत नागपुरच्या दिशेने धावत असलेल्या रेल्वेत त्या चिमुकल्याचे संपूर्ण लक्ष वडिलांकडे होते. त्याच्या वडिलांनी डोळे मिटले होते. पप्पा आँखे खोलो…मुझसे बात करो… आपको कुछ नही होगा असे म्हणत तो वडिलांना बोलते करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र त्याचे प्रयत्न व्यर्थ होते. कारण त्याच्या वडिलाचा मृत्यू झाला होता. तरीही त्याने हिंमतीने वडिलाचे पार्थिव एका राज्यातून दुसºया राज्यात घेवून गेला. अवघ्या १३ वर्षाच्या वयात त्या चिमुकल्यावर हा दु:खा चा डोंगर कोसळला होता. हृद्य हेलावून टाकणारी ही घटना नागपूर रेल्वे स्थानकावर घडली.

परिस्थिती माणसाला सारे काही शिकविते. वेळ प्रसंगी कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागते. वयाने लहान असला तरी कुटुंबात मोठा समजून आलेल्या परिस्थितीशी दोन हात करावे लागतात. खेळण्याच्या वयात वडिलाचे पार्थिव नागपुरहून बिहारला घेऊन जाण्याची वेळ त्या चिमुकल्यावर आली. आणि त्याने ही जबाबदारी हिमतीने पार पाडली. हृद्य हेलावून टाकनाºया या घटनेमुळे अनेकांची डोळे पानावली.

जुगेश्वर शाहू (५२, रा. मोतीहारी, बिहार) असे मृताचे नाव आहे. त्यांना दोन मुली आणि दोन मुले आहेत. कुटुंबाचा गाढा चालविण्यासाठी ते बेगरुळात कामाला गेला होता. प्लंबिंगचे काम करताना त्यांची तब्येत बिघडली. त्यांनी पत्नीला फोनव्दारे दिली. घरात मोठा व्यक्ती नसल्याने त्या माऊली समोर प्रश्न उभा झाला. गोविंद (१३) हाच घरातून मोठा आहे. तो सध्या ७ व्या वर्गात शिकतो. त्यामुळे त्याच्या आईने गोविंदवर ही जबाबदारी सोपविली. जो कधीच गावाबाहेर गेला नाही, त्याला एका राज्यातून दुसºया राज्यात जायचे होते. गोविंदनेही हिंमत बांधली आणि विचारपूस करीत बेंगळात पोहोचला. वडिल काम करीत असलेल्या ठिकाणचा पत्ता शोधत वडिलांची भेट घेतली. मात्र तो पर्यंत वडिलांची प्रकृती फारच ढासळली होती. त्यामुळे गोविंदने वडिलांना घेवून घरी जाण्याचा निर्णय घेतला. १७ मार्च रोजी रात्री १२२९५ बेंगळुरू – पाटलीपूत्र संघमित्रा एक्स्प्रेसने तो वडिलांना घेवून निघाला. दरम्यान बराच वेळ होऊनही वडिल काहीच बोलत नाही… कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही… शिवाय डोळेही उघडत नाही. त्यामुळे गोविंदला प्रश्न पडला. पप्पा आँख खोलो, मुझसे बात करो, आपको कुछ नही होगा असे म्हणत तो वडिलांना बोलते करण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र गोविंदचे प्रयत्न व्यर्थ होते. कारण त्याच्या वडिलाचा मृत्यू झाला होता.

संघमित्रा एक्स्प्रेसच्या जनरल बोगीत प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाली. सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास संघमित्रा एक्स्प्रेस नागपूर स्थानकावर पोहोचली. तत्पूर्वी लोहमार्ग पोलिस फलाटावर होते. जनरल बोगीतील जुगेश्वरची रेल्वे डॉक्टरनी तपासणी करुन त्याला मृत घोषित केले. तसेच शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविले. आता प्रश्न होता जुगेश्वरचे पार्थिव घेवून कोण जानार. कारण त्याच्या सोबत मोठ्या पैकी कोणीच नव्हते. परंतु गोविंदने वडिलांचे पार्थिव बिहारला घेवून जाण्याची तयारी दाखविली. एका रुग्णवाहिकेने जुगेश्वरचे पार्थिव बिहारला पाठविण्यात आले. या रुग्णवाहिकेत केवळ जुगेश्वरचे पार्थिव, मुलगा गोविंद असे दोघेच होते.