नागपूर :आगामी विधानसभा निवणुकीच्या तोंडावर आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरू झाल्या आहेत. काही लोकांना माझा राजीनामा मागितल्याशिवाय अन्न पचत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर केली आहे. आज शनिवारी, नागपूर येथे महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या वतिने ८ वे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
पोलिस पाटील सुद्धा आपल्या गावचे गृहमंत्रीच असतात. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात तुमचासुद्धा मोलाचा वाटा आहे.खरं म्हणजे गृहमंत्री म्हणून काम करत असताना शिव्याच जास्त खाव्या लागतात. काही लोकांना तर सकाळी उठल्यावर कॅमेऱ्यावर येऊन माझा राजीनामा मागितल्याशिवाय अन्नच पचत नाही. एखाद्या दिवशी जर त्यांनी राजीनामा मागितला नाही तर त्यांना अपचन होते, असे फडणवीस म्हणाले. पोलिस पाटील संघटना ही अशी संघटना आहे ज्यांनी मागे लागून काम तर करून घेतलंच पण कुणी काम केलं हे ते विसरले नाहीत. त्यामुळेच त्यांनी मला इथे बोलवून माझा सत्कार केला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असेही फडणवीस म्हणाले.
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...
सात किलो गांजा, तीन आरोपी गिरफ्तार




