Published On : Fri, Mar 30th, 2018

मेट्रो संवाद कार्यक्रमातून अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे समाधान

Advertisement


नागपूर: मेट्रोत प्रवास करण्याचा स्वप्न पाहणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना मेट्रो प्रकल्पात रोजगार मिळणार का? त्यांचा नवीन संकल्पनांना मेट्रो प्रकल्पात वाव मिळणार का? तसेच मेट्रो धावायला सुरवात झाल्यानंतर नागरिकांना प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या टॅक्सी आणि ऑटोरिक्षा चालकांचे हित साधले जाणार का? मुलांसह महिलांना आणि वयोवृद्ध नागरिकांना अतिरिक्त सुविधा असणार का? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे देताना नागपूर मेट्रो प्रकल्पाचे निर्माण करत असताना तज्ञ आणि अनुभवी माणसांची गरज असून भविष्यात मात्र आवश्यकतेनुसार तरुंनांना रोजगाराची संधी राहणार असून त्यांच्या नव्या संकल्पनावर महा मेट्रो विचार करणार असल्याचे महा मेट्रो नागपूरचे कार्यकारी संचालक श्री महादेव स्वामी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

महा मेट्रो नागपूरतर्फे सदर येथील अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित मेट्रो संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात पावर पॉइंट प्रेजेन प्रेझेन्टेशन द्वारे मेट्रोची संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.


यावेळी महा मेट्रो रिच-२ चे सहाय्यक मुख्यप्रकल्प व्यवस्थापक श्री प्रेय परिहार, अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सिव्हील शाखेचे प्रमुख सैय्यद आमिर, भौतिकशास्त्र शाखेचे प्रमुख डॉ. लीना गहाने भौतिकशास्त्र शाखेचे, सहायक प्राध्यापक शाहीद अर्षद यांच्या सह इतर शाखेचे शाखाप्रमुख आणि मोठ्या संख्येने अभियांत्रिकी विद्यार्थी उपस्थित होते.