Published On : Wed, Aug 8th, 2018

सौर उर्जेमुळे नासुप्र ने केली तब्बल २४ लाखाची बचत

Advertisement

नागपूर: औष्णिक वीज केंद्रातून किंवा इतर पारंपारिक माध्यमातून निर्मित झालेल्या विजेमुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात धोका जाणवतो, म्हणूनच पर्यावरण संरक्षणाचे ध्येय नागपूर सुधार प्रन्यास तर्फे निर्माणाधीन प्रत्येक प्रकल्पाच्या ठिकाणी सौर उर्जेचे सोलर पावर प्लांट आपल्याला बघायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणजे नागपूर सुधार प्रन्यास द्वारे नासुप्र मुख्यकार्यालयातील छतावर लावण्यात आलेले सोलर पावर प्लांट, सप्टेंबर २०१७ मध्ये ६० किलो वॅट क्षमतेचे सोलर पावर प्लांट लावण्यात आले होते व सप्टेंबर २०१७ ते जून २०१८ पर्यंतच्या कालावधीत नासुप्र ने तब्बल २४.०० लक्ष इतकी बचत मागील वर्षाच्या औष्णिक वीज बिल भरण्याच्या तुलनेत केली आहे.

नासुप्रला हे सोलर प्लांट उभारण्यास ३६.६० लक्ष इतका खर्च आला असून याठिकाणी एकूण १९४ सोलर पॅनेल बसविण्यात आले आहे. व यानंतर टप्याटप्याने नासुप्र विभागीय कार्यालय,नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभागीय कार्यालय व नासुप्र उद्यान मध्ये कार्यान्वित केले जाणार असल्याचे नासुप्र सभापती श्री. अश्विन मुदगल यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतांना सांगितले. तसेच पर्यावरण संरक्षणाचे ध्येय ठेवून ही उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.