मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘महिला मुख्यमंत्री’ हा मुद्दा राजकीय पातळीवर रंगला आहे. त्यावर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
महाविकास आघाडीतील सर्व पक्षांकडे मुख्यमंत्रीपदासाठी महिलांचे चेहरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सुप्रिया सुळे आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये रश्मी ठाकरे आहेत. आमच्या काँग्रेस पक्षात सुद्धा महिला आहेत.
शेवटी याबाबतचा निर्णय निवडून आलेली आमदार मंडळी ठरवत असतात,असेही गायकवाड म्हणाल्या.
महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली तर मला फारच आनंद होईल. महाराष्ट्र पुरोगामी आणि प्रगत आहे. महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यास महाराष्ट्र अग्रस्थानी असल्याचेही गायकवाड म्हणाल्या.