Published On : Mon, Mar 27th, 2017

SNDL चे वाढीव बिल नागरिकांनी भरु नये- युवक काँग्रेस चे नागरिकांना आव्हाहन

Advertisement

नागपुर नागपुर शहरात विद्युत् व्यवस्थेचा तीन तेरा वाजवीणाऱ्या SNDL चा आज नागपुर लोकसभा युवक काँग्रेस द्वारा निषेध करण्यात आला. प्रभाग क्र १८ मधील शिवाजी नगर, भूतेश्वर नगर, चिटनीस नगर येथील नागरिक वाढीव बिलामुळे त्रस्त झाले आहे. त्यातच SNDL च्या वसूली पथकाने नागपुर शहराच्या नागरिकांना हलाकान करुण ठेवले आहे. अवैध कनेक्शन च्या नावाखाली व विजचोरी च्या नावाखाली शहरातील संपूर्ण नागरिकांची खासगी आयुष्यात ढवळा ढवळ करित आहे. अनेक नागरिकांना वसुलीच्या नावाने धमकवन्याचा सपाटा SNDL ने लावला आहे. या सर्व मुद्द्याना हेरुन नागपुर लोकसभा युवक काँग्रेस च्या वतीने तूलशीबाग येथील SNDLकार्यालयात धड़क आंदोलन केले.

या वेळी नागपुर शहर अध्यक्ष व नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात परिसरातील शेकड़ो नागरिकांनी हल्लाबोल केला. युवक काँग्रेस व नागरीक कार्यालयात गेले असता तिथे एकहि जबाबदार अधिकारी नव्हता.

या वेळी नगरसेवक बंटी शेळके यांनी SNDL च्या गलथान कारभराचा पर्दाफ़ाश केला. SNDL चे वसूली पथक कधीही लोकांचा घरी जातात. लोकांना धमकावतात,जेव्हा की विद्युत् अधिनियम २००३ च्या नुसार ठराविक वेळेतच अधिकारी ग्राहकाच्या घरी जाउन मीटर तापसु शकतात परंतु माजलेले व उर्मठ असे SNDL वसूली अधिकारी हे पहाटे नागरिकांच्या घरी जातात त्यांना मज्जाव केला असता नागरिकांना धमकवन्याचा प्रकार करतात. आणि मीटर तापसनीच्या नावाखाली ग्राहकांच्या शयनकक्षात जाण्याची हिम्मत सुद्धा करतात. आणि महत्वाचे म्हणजे या स्वतःला वसूली अधिकारी म्हणवीणाऱ्या सदस्याजवळ अधिकृत ओळखपत्र सुद्धा राहत नाही. अशातच बंटी शेळके यांनी वसूली पथक अधिकारी पुरोहित यांची चौकशी करुण त्वरित करवाई करुण निलंबित करण्यात यावे अशी मागणी केलि.

या सर्व बाबींवर नागपुर लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष बंटी शेळके यांनी SNDL अधिकाऱ्यांना सरळ खड़सावुन सांगितले की जर या पुढे नागरिकांना त्रास झाला तर युवक काँग्रेस SNDL कार्यालवार आक्रामक आंदोलन करेल. व यावेळी बंटी शेळके यांनी नागरिकांना जाहिर आव्हाहन केले की SNDL चे वाढीव बिल कोण्याही नागरिकांनी भरु नए.

या वेळी प्रमुख रूपाने राजेन्द्र ठाकरे,प्रशांत तन्नेरवार,अनिकेत समुंद्रे,फजलुर कुरेशी,स्वप्निल ढोके,राम पराड़कर,स्वप्निल बावनकर,हेमंत कातुरे,शेख अजहर,शुभम चौधरी,कुणाल जोध,अजय महल्ले,सौरभ शेलके,नीलेश देशभर्तार,पूजक मदने,सागर चौहान,अभिजीत ठाकरे,आशीष ठाकरे,रोशन पंचबूदे,मसराम ताई,शांता भोयर,कमलताई वांदे,रितेश बावनकर,रोहित बावनकर,मोतीराम मोहादिकर,राकेश निकोसे,चेतन थूल,रेनॉल्ड जेरोम,समीर काले,प्रदीप शाहू,तेजस मून,अथर्व पोहनकर,समीर येवले,आसिफ शेख,नीलेश नायक,माधव जूगेल,शुभम ठाकरे,मोंटू मुटकुरे,चेतन शेलके,महेश ठाकरे,गणेश सराते,क्रान्ति जैन,नितिन सुरुषे,अन्नू गुप्ता,अरुण ब्रेवर,चेतन यादव,प्रांजल काकड़े,मिथिलेश जोगे,विक्रम भोइते,पंकज तुपकर,ईशान पठान,इम्मू खान,अल्तमश साजिद,नवेद शेख,राकेश बावनकर,कारन लखपति,चेतन लताड़,मयूर गुललिपवार,धीरज निकम,सागर फाये,अतुल गुरजलवार,अंकुश शेलके,दीपक पोल,शैलेश पाठमासे,दिनेश बावने,अक्षय काम्बले,मंगेश खुरसडे,अमोल खुरसदे,धनराज रेणके आदि कार्यकर्ते उपस्तिथ होते.