Published On : Tue, Aug 11th, 2020

मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील बंगल्यात निघाला साप

Advertisement

नागपूर : मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या येथील रामगिरी बंगल्यात मंगळवारी साप निघाला. हा साप बिनविषारी धामण जातीचा होता. सर्पमित्राला पाचारण केल्यावर त्याला पकडून ट्रॉन्झिट सेंटरकडे सोपविण्यात आले.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वायरलेस रुममध्ये हा साप असल्याचे दुपारी पोलिसांच्या लक्षात आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांच्या रायफलला गुंडाळून तो बसला होता.

Gold Rate
02 Aug 2025
Gold 24 KT 99,800 /-
Gold 22 KT 92,800/-
Silver/Kg ₹ - ₹- ₹1,11,300/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांनी सर्पमित्र शुभम पराळे यांना या संदर्भात माहिती दिल्यावर त्यांनी पोहचून सापाला पकडले. पलंगाखाली असलेल्या पोलिसांच्या रायफलला वेटोळे घालून तो बसला होता. सुमारे सात फूट लांबीचा हा साप होता. पराळे यांनी सुखरूपपणे रेस्क्यू करून त्याला ताब्यात घेतले.

नंतर वन विभागाच्या सेमिनरी हिल्स ट्रान्झिट सेंटरमध्ये पंचनामा करून वनविभागाच्या स्वाधीन केले. वैद्यकीय तपासणीनंतर सापाला निसर्गमुक्त केले जाणार आहे.

Advertisement
Advertisement