नागपूर : हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी अवैध मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई करत लक्झरी ऑडी कारमधून विदेशी मद्याचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात वाहनचालकाला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याकडे ही मद्याची खेप नेली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार दिघोरी चौक येथे नाकाबंदी करण्यात आली. संशयित ऑडी कार थांबवून तपासणी केली असता, कारमधून विविध ब्रँडच्या विदेशी मद्य व बिअरच्या सुमारे १६ पेट्या आढळून आल्या.
जप्त केलेल्या मद्याची किंमत सुमारे ९४ हजार रुपये असून, वाहन व इतर साहित्यांसह एकूण जप्तीची किंमत १२ लाख ९४ हजार रुपयांपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव प्रवीण कुरेवार असून तो नंदनवन परिसरातील रहिवासी आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपीने मद्याच्या स्रोताबाबत समाधानकारक माहिती दिली नसल्याने पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. हे मद्य मध्यप्रदेशातून आणले होते की शहरातील इतर ठिकाणाहून चंद्रपूरकडे पाठवले जात होते, याबाबत तपास सुरू आहे.
FDA पर ज्वाला धोटे का बड़ा आरोप! “होटल वालों से होती है...
नागपुर में NCP का तिरंगा मोर्चा! #NagpurNews #NCP#TirangaMorcha #maharashtranews
मुंबई में किसान आंदोलन! ‘वर्षा’ की नीलामी की मांग #Mumbai #Protest #MaharashtraNews...
12 करोड़ का फायर सिस्टम फिर भी बंद! #WardhaNews #WardhaHospital #FireSafety #MaharashtraNews
अमित ठाकरे बोले- सेल्फी नहीं, अपनी समस्या बताओ! #NagpurNews #MNS #StudentIssues #MaharashtraNews
LIVE | NEWS BULLETIN NAGPUR TODAY





