Published On : Sat, Jun 15th, 2024
By Nagpur Today Nagpur News

स्मार्ट मीटर’ योजना रद्द,घरोघरी पूर्वीचेच मीटर कायम राहणार; राज्य सरकारचा निर्णय

Advertisement

मुंबई: राज्य सरकारकडून घरोघरी ‘स्मार्ट मीटर’लावण्यात येणार अशी योजना आखण्यात आली होती. मात्र आता हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.याविरोधात वाढत चाललेला असंतोष पाहता राज्य सरकारने हा निर्णय मागे घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फड‌णवीस यांनी मुंबईत शुक्रवारी भाजपच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत याबाबत चर्चा केली व सामान्य वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर लावण्यात येणार नाही असे स्पष्ट केले असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना दिली.

आता घरगुती आणि लहान व्यावसायिकांसाठी स्मार्ट मीटर न लावता ते केवळ औद्योगिक आणि मोठ्या वीज ग्राहकांसाठी लावले जातील. अदानी पॉवर, जीनस कंपनी, एनसीसी कंपनी, मॉन्टेकालों या चार कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आले होते. साधारण हप्ताभरात हे नवीन मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरु होणार होती. परंतु आता फडणवीस यांनीच सामान्य वीज ग्राहकांकरीता स्मार्ट मीटर आणली जाणार नाहीत असे स्पष्ट केल्याने सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.