Advertisement

Representational Pic
नागपूर: नागपूर विभागातील शासकीय कार्यालये व जिल्हा परिषदा येथील पात्र कर्मचाऱ्यांसाठी 6 वी महाराष्ट्र लेखा लिपीक परिक्षा डिसेंबर-2017 चे आयोजन दिनांक 26 ते 30 डिसेंबर 2017 या कालावधीत शासकीय विज्ञान संस्था, महाराजबागे जवळ, नागपूर या केंद्रावर करण्यात आले आहे.
उमेदवारांची यादी त्यांचे कार्यालयाला तसेच संबंधित जिल्हयाच्या कोषागार कार्यालयाला पाठविण्यात आली आहे. उमेदवारांनी परिक्षेस उपस्थित राहताना फोटो असलेले व कार्यालय प्रमुखाने साक्षांकित केलेले ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हयाच्या कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे लेखा व कोषोगाराचे सहसंचालक यांनी कळविले आहे.