Published On : Sat, Nov 2nd, 2019

महा मेट्रो : सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटीव्ह चौक पर्यंतचे कार्य जलद गतीने सुरु

Advertisement

रिच – २ व्हायाडक्ट आणि स्टेशनचे ६२% कार्य पूर्ण

*नागपूर ०२ :* महा मेट्रोच्या सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटीव्ह चौक रिच-२ कॉरीडोरचे कार्य जलद गतीने सुरु असून आता पर्यत (व्हायाडक्ट आणि स्टेशनचे) ६२ % कार्य पूर्ण झाले आहे. सिताबर्डी इंटरचेंज ते आटोमोटीव्ह चौक (कामठी रोड) पर्यंत अश्या ७.२३ किमीच्या या मार्गावर एकूण ७ मेट्रो स्टेशन प्रस्तावित आहे ज्यामध्ये झिरो माईल,कस्तुरचंद पार्क,गद्दीगोदाम चौक,कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड आणि आटोमोटीव्ह चौक मेट्रो स्टेशनचा समावेश आहे .

या मार्गावर शासकीय कार्यालय,रिजर्व बँक,खाजगी – व शासकीय बँक,औद्योगीक वसाहती, शासकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय,राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे रिच-२ मार्गावर वाहनचालकांची मोठी गर्दी होताना निदर्शनास येते.

याशिवाय राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावर जड वाहणाचे आवागमन देखील मोठ्या प्रमानात होते. यामुळे वाहन चालवताना होणारा त्रास आणि वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी येणाऱ्या काळात मेट्रो नव्कीच फायदेशीर ठरणार.

गद्दीगोदाम चौक ते आटोमोटिव्ह चौक(कामठी रोड) पर्यत मेट्रो निर्माण कार्यासोबतच राष्ट्रीय महामार्गच्या(एनएचएआई)डबल डेकर उड्डाणपुलाचे निर्माण कार्य होत असल्याने, कार्य पूर्ण झाल्यास या मार्गावर महत्वाचा बदल नागरिकांना येत्या काळात बघायाला मिळणार आहे.

आतापर्यंत झालेल्या कार्याची अधिकृत आकडेवारी पुढील प्रमाणे आहे :
पाईल्स १६४३ पैकी १६०३, पाईल कॅप २२१ पैकी २०५,पियर २१७ पैकी १७९, पियर कॅप २१७ पैकी १७४, सेग्मेंट कास्टिंग २३२२ पैकी १७२५, स्पॅन इंरेव्कशन २२२ पैकी ८२,विंग्स कास्टिंग ३२८५ पैकी १२६८, विंग्स इंरेव्कशन ३२० पैकी ११ झाले असून असून गर्डर लाँचिंग चे कार्य प्रगतीपथावर आहे.