नागपूर: सरपंच संतोष देशमुख हत्येची पाळेमुळे खोदून काढणार असून या प्रकरणाची SIT चौकशी करणार असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. बीड जिल्ह्यातील सरपंच सतोष देशमुख यांच्या हत्येबाबत फडणवीस हे सभागृहात निवदेन देताना हे विधान केले. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची माहिती फडणवीस यांनी सभागृहाल दिली.आरोपी वाल्मिक कराड याच्या विरोधात पुरावे मिळाले तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले.
कराड याने दोन कोटीची खंडणी मागण्याची धमकी दिली होती, असा आरोप आहे. या प्रकरणातील प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी आढळल्यास त्यांच्यावर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणाले. या प्रकरणाची पाळेमुळे खोदून काढण्यात येईल.
एसआयटी आणि न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, देशमुखांच्या कुटुंबियांनी 10 लाखांची मदत सरकारकडून करण्यात येईल, असे फडणवीसांनी सांगितले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून बीडमधील सरपंच हत्या प्रकरणाचा मु्द्दा चर्चेत आला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येचे तपशील समोर आल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेचे पडसाद विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही उमटल्याचे पाहायला मिळाले.