Published On : Tue, Jun 9th, 2020

भूमिगत वीज वाहिनीच्या कामात अनियमितता करणाऱ्याची एसआयटी मार्फत चौकशी करा:-सुरेशभाऊ भोयर

कामठी :-शहरातील विजचोरीवर आळा घालीत वस्त्या वस्त्या प्रकाशमय व्हावी यासाठी कामठी शहरात भूमिगत वीज वाहिनी घालून शक्य त्या चौकात हायमास्ट लाईट लावण्याचे नियोजित केल्यानुसार भूमिगत वीज वाहिनी चे कंत्राट रमेश इलेक्ट्रीकल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले यानुसार सदर कंत्राट मिळालेल्या कंपनी ने कामात अनियमितता करीत मागील दोन वर्षांपासून केबल अर्धवट खड्डे खोदून सोडण्यात आले तर उघड्यावर असलेले या इलेक्ट्रिक केबल मुळे नागरिकांच्या जीवाला धोकादायक ठरत आहे तसेच सखी इलेक्ट्रिकल्स प्रायव्हेट लिमिटेड

या कंपनीने नागपूर जिल्ह्यातील कामठी-मौदा तालुक्यातील हायमास्ट लावण्याचे कंत्राट घेतले या कामात जवळपास 20 कोटी रूपये चे काम या कंपनीने केले असून कामठी नगर परिषद हद्दीत नियोजित ठिकाणी हायमास्ट लावण्यात आले नसून येथील एका भाजपा कार्यकर्त्यांच्या मनमर्जीप्रमाने हायमास्ट लाईट लावण्यात आलेले आहेत वास्तविकता शासनाने काढलेल्या निविदेप्रमाणे काम करण्यात आले नसून निविदेत उल्लेखित कामानुसार काम करण्यात आलेले नाही त्यातच कमी दर्जाचे साहित्य वापरून या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आलेला आहे

तेव्हा सदर कंत्राट असलेले रमेश इलेक्ट्रिकल प्रायवेट लिमिटेड व सखी इलेक्ट्रिकल प्रायवेट लिमिटेड या दोन्ही कंपनीचे शिल्लक देय थांबविन्यात यावे व यांच्यावर कारवाही करीत एसआयटी ची चौकशी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी चे सरचिटणीस व नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी पालकमंत्री ना नितीन राऊत यांच्याकडे केलेल्या तक्रारीत केले आहे