Advertisement
आमदार कृष्णा खोपडे यांचे अधिका-यांना निर्देश
नागपूर: जयभीम चौक ते संघर्षनगर वाठोडा येथील सीमेंटरोडवरील तांत्रिक अडचणी त्वरित सोडवूण काम पूर्ण करा, असे निर्देश पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी दिले.
प्रभाग क्र.26 चे नगरसेवक व विधी समिती सभापती अड धर्मपाल मेश्राम यांच्या पुढाकाराने आयोजित प्रशासनिक पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी त्यांनी संबंधित अधिका-यांना निर्देश दिले.
यावेळी प्रकल्प अभियंता अमीन अख्तर, उपअभियंता श्री.गभने, कनिष्ठ अभियंता (विद्युत) श्री.ढगे, एसएनडीएलचे व्यवस्थापक नागेंद्र येडुलूरू, बालू रारोकर, राजेश संगेवार प्रामुख्याने उपस्थित होते.