Published On : Fri, Apr 9th, 2021

कामठी येथे महानत्यागी बाबा जुमदेव यांची जयंती साधेपणाने साजरी

कामठी :-मानव धर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेव यांच्या 100 व्या जयंती निमित्त परमपूज्य परमात्मा एक सेवक व बहुउद्देशीय संस्था कामठी आजनी येथील परमात्मा एक भवन येथे शासनाने दिलेल्या आदेशानुसार कमी सेवकांचा उपस्थित बाबा जुमदेव जी चा प्रतिमेला माल्या अर्पण करून जगात पसरलेली कोविड रोगाचा नायनाट करावा अशी विनंती भगवान बाबा हनुमानजी व महान त्यागी बाबा जुमदेवजी यांना करण्यात आली.

महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी आपले संपुर्ण जीवन गोर गरीब दुःखी कष्टी वेसणाने त्रस्त लोकांचे जीवन अंधश्रद्धा पासून दूर करण्यासाठी निष्काम भावनेने कार्य केले तसेच समाजातील दुःखी कष्टी अज्ञानी मानवास व्यसन अंधश्रद्धेतून मुक्त केले. अनेकांना बाबाच्या शिकवणीचा प्रभाव पडल्याने सेवक सेविकानी मानव धर्माचा मार्ग पत्कारला. बाबा जुमदेवजींच्या शिकवणीने लाखो लोक व्यसनमुक्त होऊन सुखी झाल्याचे मत सेवक प्रदीप भोकरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केले.

सदर कार्यक्रमात कामठी च्या मार्गदशिका श् सरस्वता बाई मोहतुरे , प्रदीप भोकरे ,हरीश भोयर , रवी मोहतुरे , रमेश नकाते , रवी देवतळे , लुटे ,श्मनीष नकाते व बरेच सेवक सेविका मोठ्या संख्येत उपस्थित राहून नियमाचे पालन करीत सर्वाना शुभेच्छा दिल्या