Published On : Thu, May 18th, 2023
By Nagpur Today Nagpur News

कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कमोर्तब !

Advertisement

– कर्नाटकमध्ये काँग्रेसने बहुमताचा आकडा पूर्ण केला आहे. मात्र अद्यापही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोघांमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर आली होती.

मात्र आता काँग्रेस श्रेष्ठींनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदासाठी सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कमोर्तब केले आहे. यासंदर्भात काँग्रेसचे सचिव के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. आज त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

Gold Rate
Feb 17 th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,54,000 /-
Gold 22 KT ₹ 1,43,200 /-
Silver/Kg ₹ 2,40,500 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कर्नाटकात १० मे रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान झाले. तर, १३ मे रोजी निकाल जाहीर झाला. या निकालात काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठला. कर्नाटकमध्ये अगोदर निवडणूक होऊ द्या, मग मुख्यमंत्री ठरवू अशी भूमिका मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्यांनी घेतली होती. परंतु आता निकालानंतर मुख्यमंत्री पदी कोणत्या नेत्याची वर्णी लागणार यासंदर्भात सिद्धरामय्या आणि शिवकुमार संघर्ष पेटला होता.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement