Published On : Fri, Aug 30th, 2019

श्रीराम शिक्षण संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

रामटेक: श्रीराम शिक्षण संस्था द्वारा संचालित सर्व शाळांचा सारस्वत विद्यार्थी मंडळाचा वार्षिक उत्सव हर्षोउल्हासात साजरा करण्यात आला. 67 व्या वर्धापन दिवसाला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार समारोह संपन्न झाला. श्रीराम कन्या विद्यालयातून आस्था किरण मर्जीवे हिने 88 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक येण्याचा मान पटकाविला तर द्वितीय क्रमांक समृद्धी धर्मराज सायरे हया विद्यार्थीनीने द्वीतीय येण्याचा मान पटकाविला.

श्रीराम विद्यालयातील प्रफुल संजय कोल्हे हया विद्यार्थांने 87 टक्के घेऊन प्रथम येण्याचा मान पटकाविला तर द्वितीय क्रमांक प्रतीक गजानन भुते या विद्यार्थ्याने पटकावला. त्याबद्दल त्यांचा बक्षीस व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करून त्यांचा सत्कार करण्यात आला. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी विद्यार्थी पवन परिहार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मॉइल मैनेजर सचिन रामटेके तथा कार्यक्रमाचे प्रमुख वक्त्या श्रीराम शिक्षण संस्थेच्या सदस्या माणिकताई काशीकर प्रामुख्याने उपस्थित होत्या .श्रीराम शिक्षण संस्थेच्या सर्व शाळंचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक ईश्वर आकट,सौ. उषा गेडेकर, अरूण कोसेकर ,जयदेव डडोरे, पुष्पा कामळे, पर्यवेक्षक मोहन काटोले ,गोपी कोल्हेपरा मंचावर उपस्थित होते.

शेकडो पालकवृंदाच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. श्रीराम विद्यालय तथा कन्या विद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी वाद्यासह सुंदर स्वागत गीत ,स्तवन व भक्तीगीत सादर केली . प्रमुख वक्त्या श्रीमती माणिक काशीकर यांनी विद्यार्थ्यांना मडंळाचे उद्दिष्ट व गोष्टीरूपाने सविस्तर मार्गदर्शन केले . कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सुंदर गरबा नृत्य करून दही हांडी फोडली . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाध्यक्ष बबलू यादव यांनी केले कार्यक्रमाचे संचालन किरण शहारे ,मनीषा हजारे यांनी केले पसायदान व आभार प्रदर्शन अमोल गाडवे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे सर्व सदस्य व शिक्षक यांनी परिश्रम घेतले.