Published On : Sun, Sep 29th, 2019

बंगलोर ते अयोध्या पायदळी श्रीराम भक्तांचे कन्हान कांद्रीला स्वागत

१५ ऑगस्ट ते १ नोव्हेंबर यात्रेकरू ची बंगलोर ते अयोध्या पदयात्रा.

कन्हान : – अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर निर्माण करण्याचा संकल्प घेऊन बंगलोर ते अयोध्या करीता डोक्या वर वीट घेऊन रामऱथासह निघालेल्या पदयात्रेकरूंचे कन्हान, कान्द्री व टेकाडी शहरात स्वागत करण्यात आले.

अयोध्या येथे श्रीराम मंदीर निर्माण करिता डोक्यावर विट घेऊन रामरथासह पायदळ यात्रेकरू १५ ऑगस्टला बंगलोर वरून प्रस्थान करून १ नोव्हेंबर ला अयोध्या येथे पोहचणार आहे. बँगलोर निवासी रामभक्त मंजुनाथ महाराज व त्यांचे सहकारी अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर निर्माण व्हावे या संकल्पासह श्रीराम व हनुमान मुर्ती असलेल्या राम रथ व डोक्यावर वीट घेऊन पदयात्रा नागपूर शहराचे भ्रमण करून शनिवार (दि.२८) ला कन्हान शहरात पोहोचली असता बँंड वाज्यासह कन्हान, तारसा रोड, कांद्री व टेकाडी महामार्गाने भ्रमण करित असताना पदयात्रेकरूंचे जंगी स्वागत करण्यात आले.

स्वागताचे संपूर्ण नियोजन भूमिपुत्र युवा प्रतिष्ठान व्दारे अध्यक्ष अतुल हजारे यांनी केले होते. या प्रसंगी मा शंकरभाऊ चहांदे, रामभाऊ दिवटे, राजेंद्र शेंदरे, व्यकंटेश कारेमोरे, शिवाजी चकोले, मनोज कुरडकर, सुरेंद्र बुधे, रानु शाही, वामन देशमुख, दिनेश खाडे, सौरभ पोटभरे, नितेश कामडे, संकेत चकोले, गणेश किरपान, रोहित चकोले, चक्रधर आकरे, मोंटू सिंग, राजेश पोटभरे, गणेश शर्मा, चंद्रकांत बावणे, प्रफुल हजारे, महेश बावनकुळे, सागर टेकाम, सौ. अरुणा हजारे, सौ सुनंदा दिवटे, सौ. वंदना गडे आदीसह मान्यवरांनी उपस्थित होऊन स्वागत केले.