हजारोच्या संख्येत रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी
विविध चित्ररथाने फेडले डोळ्यांचे पारने
परिसरातील भानेगाव येथील श्री साई मंदिर वर्धापनदिना निर्मित्त आयोजित पालखी सोहळा व भव्य शोभायात्रेत जनसागर उसळला शोभायात्रा मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा हजारोच्या संख्येत नागरिकांनी गर्दी केली होती जणू भानेगाव, खापरखेडा येथे शिर्डी अवतरल्याचे जाणवत होते दिनांक 15 एप्रिल सोमवारला श्री साई मंदिर भानेगाव येथील मंदिराचा वर्धापन दिवस दरवर्षी श्री साईबाबा शोभायात्रा आजिवन कमेटी व नागरिकांच्या सहकार्याने पालखी सोहळा उत्सव व भव्य शोभयात्रेचे आयोजन केल्या जाते 15 एप्रिल सोमवारला पहाटे 4.30 वाजता श्री साईची काकड आरती, मंगलस्नान, अभिषेक, भजन, किर्तनासह विविध कार्यक्रम पार पडले सायंकाळी 6 वाजता भानेगावचे सरपंच रविंद्र चिखले, समाजीक कार्यकर्ता नारायण उपासे, अशोक झिंगरे, अमर जैन, कृष्णा नमलेवार, दामोदर हाते, अशोक वंजाळ, रामराव घुगल, देवराव चिकनकर, डोमा निखाडे यांच्या हस्ते श्री साईची महाआरती करण्यात आली यावेळी श्री साईबाबा यात्रा आजिवन कमेटीचे सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री साईच्या पालखीचे पूजा-अर्चना करून शोभयात्रेला सुरुवात करण्यात आली शोभायात्रेत 11 घोडे, 3 उंट, बाभुळगाव बॅन्ड, डि.जे.साउंड, बग्गी, भजन मंडळ, राम-लक्ष्मण-सिता, हनुमान, गजानन महाराज, गणपती, शंकर पार्वती, राधा कृष्ण, लव-कुश चित्ररथ सामील करण्यात आले होते विविध वेशभूषेत शिवाजी महाराज, संभाजी महाराज, झाशीची राणी, तात्या टोपे, अफजल खान, जिजा माता, राजस्थानी, मावळा, अहिल्या बाई होडकर, मल्हार, बाजीराव पेशवे, राणी पद्मावती, खिलजी, अंग्रेज, महाराणा प्रताप आदि विराजमान झाले होते ठिकठिकाणी स्वागत द्वार लावण्यात आले होते शोभायात्रा मार्गावर शरबत, मठ्ठा, आईस्क्रीम, दूध, आलूभात बुंदी, साबुदाना खिचडी, हलवा यासह विविध नस्त्यांचे वितरण विविध राजकीय व सामाजिक संघटनाकडुन करण्यात आले रस्त्याच्या दुतर्फा हजारोच्या संख्येत शोभायात्रा बघण्यासाठी नागरिकांची गर्दी जमली होती यावेळी जोरदार फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली शोभायात्रेत महिला व तरुणांसह शेकडो साई भक्त सामील झाले होते सदर शोभायात्रा श्री साई मंदिर, उपासे ले-आऊट, नविन बिना, प्रकाश नगर काॅलोनी, राममंदिर, रेल्वे चौकी, जार्ज काॅलोनी चौक आदि परिसरातून भ्रमण करून श्री साई मंदिरात समारोप करण्यात आला यावेळी हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.