नागपुर- रेशीमबाग श्री संत गजानन महाराज चौकात निमित्य लोकजागृती मोर्चा आणि युवारंग मित्रपरिवार द्वारा श्रीरामजन्मभूमी भूमिपूजन निमित्य आनंदोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या आनंदोत्सवात सर्वप्रथम श्रीरामचंद्राच्या फोटोचे पूजन करून श्रीरामरक्षास्तोत्रचे सामूहिक पठण करण्यात आले.
यानंतर रामाची मंगल आरती करून रामभक्तानी उत्साहात जय श्रीराम, सियाबल रामचंद्र की जय च्या शंखनाद करून जयघोष केला व प्रसाद म्हणून बुंदीचे लाडू वाटण्यात आले. याप्रसंगी अयोध्या येथे कारसेवेला उपस्थित अँड रमण सेनाड यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी डॉ श्रीरंग वराडपांडे, गौरव शाहकार, विनय शाहू, प्रणव तांदुळकर, wविनायक, आदित्य मेढेकर, आदी युवा रामभक्त उपस्थित होते.
Advertisement









