Published On : Wed, Feb 26th, 2020

थानेदार अजय त्रिपाठी यांचे ग्रा प गोंडेगाव व्दारे स्वागत

कन्हान : – पोलीस स्टेशन पद्दी पोलीस निरिक्षक म्हणुन श्री अजय त्रिपाठी रूजु झाल्याने ग्राम पंचायत गोंडेगाव सरपंच व्दारे स्वागत करण्यात आले.

सोमवार (दि.२४) कन्हान पोलीस स्टेशन ला पोलीस निरिक्षक म्हणुन श्री अजय त्रिपाठी यांचे गोंडेगाव ग्राम पंचायत सरपंच नितेश राऊत हयानी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व रेंगाळत असलेल्या गोंडेगाव पुनर्वसना बाबत च्या समस्या विषयी चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी गोंडेगाव ग्राम पंचायत सरपंच नितेश राऊत, उपसरपंच सुभाष डोकरी मारे, सुनील धुरिया, अजय मेहता प्रामुख्याने उपस्थित होते.