Published On : Wed, Jan 2nd, 2019

भाजपा अनु.जाती मोर्चा व्दारे शौर्य दिवसी अभिवादन

कन्हान : – भाजपा अनु:सुचित जाती मोर्चा कन्हान व्दारे शौर्य दिवसी कार्यक्रमाचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले .

आंबेडकर चौक कन्हान येथे कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदन मेश्राम यांच्या हस्ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व भिमा कोरेगाव विजय स्तंभाच्या प्रतिकृतीस दीप प्रज्वलन करून पुष्प अर्पण करून अभिवादनाने कार्यक्रमाची शुरूवात केली. याप्रसंगी भाजपा अनु:सुचित जाती मोर्चा अध्यक्ष हर्ष पाटील यांनी मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे संचालन माधव वैद्य यांनी तर आभार संदीप कभे यांनी व्यकत केले.

यावेळी मयुर माटे, सुनिल लाडेकर, किरण ठाकुर, राजेंन्द्र शेंदरे ऋृषभ बावनकर, प्रकाश कुर्वे, हरीओम नारायण आणि भाजपा कार्यकर्ता प्रामुख्याने उपस्थित होते .